आपल खान्देशमहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या चार बालकांना यंदाचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, करून घ्या त्यांची ओळख

महाराष्ट्राचे प्रतिभावंत बालक शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय आणि स्वयंम पाटील यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२ जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केले आणि प्रातिनिधिक बालकांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सहा श्रेणींमध्ये देशातील २९ बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२’ साठी निवड केली. यात महाराष्ट्रातील जळगाव येथील शिवांगी काळे (६), पुणे येथील जुई केसकर (१५), मुंबई येथील जिया राय (१३) आणि नाशिक येथील स्वयंम पाटील (१४) या बालकांचा समावेश आहे. पदक, १ लाख रूपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी कला व संस्कृती, शौर्य, नवसंशोधन, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा या सहा श्रेणींमध्ये ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’-२०२२ पटकावणाऱ्या २९ बालकांना डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केले. पुरस्कार विजेत्यांमध्ये २१ राज्य व केंद्र प्रदेशातील १५ मुले आणि १४ मुलींचा समावेश होता. या कार्यक्रमातच प्रधानमंत्र्यांनी वर्ष २०२१ च्या ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या ३२ बालकांना डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई उपस्थित होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे