भडगाव तालुक्यातील स्वच्छतागृह योजनेत गैरव्यवहार प्रकरणी, विजय पाटील यांचे आजपासून उपोषण
जळगाव, ता. २4 गटविकास अधिकारी रमेश वाघ यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शौचालय योजना व प्रशासक गैरव्यवहारप्रकरणी दोन दिवसांत कार्यवाही करून अहवाल पाठवा, असे आदेश तक्रारदार विजय पाटील यांच्यासमोर दिले होते, असे पाटील यांचे म्हणणे आहे. तरीही कारवाई न केल्याने विजय पाटील २४ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण करणार आहेत. त्यांनी म्हटले आहे, की भडगाव तालुक्यात वैयक्तिक स्वच्छतागृह योजनेत गैरव्यवहार झाला आहे. विजय पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया याच्यांकडे कारवाईची मागणी केली होती. सीईओ भडगाव दौऱ्यावर असताना पाटील यांनी त्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. त्यावर अहवाल पाठविण्याच्या बीडीओंना सूचना दिल्याचे विजय पाटील यांचे म्हणणे आहे. मात्र संबंधितानी कारवाई केली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. संबंधितावर कारवाई होत नाही म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते विजय पाटील सोमवार (ता. २४) पासून जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसणार आहेत.



