ब्रेकिंग

शहीद अमोल पाटील वीर जवान यांच्यावर अंत्यसंस्कार उद्या सोमवारी बोलठाण येथे होणार 

शहीद अमोल पाटील वीर जवान यांच्यावर अंत्यसंस्कार उद्या सोमवारी बोलठाण येथे होणार
बोलठाण गावात सर्वत्र स्वच्छता उपक्रम साजरा
नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील रहिवाशी व सशस्त्र सीमा तालातील जवान अमोल हिम्मतराव पाटील वय वर्षे 30 हे भारत नेपाळ बिहार मधील सुपौल मध्ये कर्तव्य बजावत असताना 14 जानेवारी 2022 रोजी शुक्रवारी विजेच्या धक्क्याने दोन जवानांसह शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी सोमवारी येथे अंत्यसंस्कार होणार असून त्यानिमित्ताने बोलठाण सर्वत्र साफसफाई करण्यात आली असून एक प्रकारची स्वच्छता मोहीमच येथे राबविण्यात आली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तसेच वीर जवान अमोल राव पाटील यांचे कट आउट श्रद्धांजलीपर लावण्यात आलेले आहेत.
काही तांत्रिक अडचणीमुळे शनिवारी दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी शनिवारी शहीद जवान अमोल पाटील यांचे पार्थिव बोलठाण येथे आणता आली नाही. मात्र रविवारी सायंकाळी विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात येणार असून ते औरंगाबाद येथील छावणी येथे सैनिक प्रशिक्षण केंद्रात रात्रभर ठेवल्यानंतर सोमवारी 17 जानेवारी रोजी आणले जाणार आहे. याच दिवशी शासकीय इतमामात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. अशी माहिती नांदगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार रत्नाकर मारकड व माजी सैनिक संघाचे नानासाहेब काकडे यांनी दिली. अमोल पाटील यांच्या अंत्यविधीची पूर्वतयारी बोलठाण येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल तात्या रिंढे, रफिक पठाण बोलठाण पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव, सरपंच वाल्मीक गायकवाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच जातेगाव येथील माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी ग्रामस्थ करत आहे. अमोल पाटील यांच्या पश्‍चात आई, अविवाहित भाऊ, पत्नी आणि नऊ महिन्याची चिमुकली मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे