पाचोरा नगरपालिका ओपन स्पेस अतिक्रमण निकृष्ट आणि नियम बाह्य कामांचा तक्रारी अर्ज दाखल!
पाचोरा नगरपालिका ओपन स्पेस अतिक्रमण निकृष्ट आणि नियम बाह्य कामांचा तक्रारी अर्ज शेखर पाटील
पाचोरा भास्कर नगर मधील शेखर पाटील यांनी पाचोरा नगरपालिका यांना दिनांक 10/1/2022 रोजी आणि 11/12022 रोजी तक्रार अर्ज केलेले आहे पाचोरा शहरातील भास्कर नगर येथील आणि शहरात विविध ओपन स्पेस विकसित करण्यासाठी कामे सुरू आहे नगर रचना जळगाव यांच्याकडून प्राप्त लेआउट नुसार त्या त्या भागात जागेवर अंदाजपत्रकानुसार ऑनलाइन ऑफलाइन निविदा काढण्यात आल्या त्यानुसार मक्तेदाराने सदर निविदा भरून काम घेतले सदर निविदाधारका ने कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेल्या ठेकेदारांना त्यांच्या स्वतःच्या मर्जीने कामे वाटून देण्यात आले ओपन स्पेस कामे सुरू असून लेआउट अनुसार कामे होत नसल्याने तक्रारदारांनी नमूद केले आहे ओपन स्पेस मध्ये कोणाचे अतिक्रमण आहे रस्ता आहे दोन फुटापासून ते दहा फुटापर्यंत सोडून देण्यात आल्यामुळे ठेकेदार लेआउट अनुसार तंतोतंत कामे करत नसल्याने त्वरित कामे बंद करून अंदाजपत्रकानुसार कामे पूर्ण करावी
पाचोरा शहरात अनेक ठिकाणी ओपन स्पेस ची कामे सुरू आहेत! तर काही ठिकाणी लेआउटनुसार कामे होत नसल्याची तक्रार संबधितानी करावी! अंदाजपत्रकातील अटी शर्ती नुसार कामे केले नाहीत तर मक्तेदारानी रक्कम अदा करु नये! वरील विषयी तक्रार दिल्यामुळे ठेकेदाराच्या धमक्या देणे सुरू झाले! त्यामुळे लगेच दुसरा अर्ज धमकी विषयी चा पाचोरा नगरपालिका यांना देण्यात आला आहे! प्रत रवाना पुढील कार्यवाही साठी वरील बाबतीत कोणतीही कार्यवाही न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे अर्जदारानी स्पष्ट केले असून त्यासाठी लागणारा खर्च हा चुकीचे कामे करण्यार्याकडुन वसुल केला जाईल याची नोंद घ्यावी.



