आपल खान्देश

दिव्यांग योजनांप्रमाणे शासकीय आदेशही फक्त कागदोपत्री अमळनेर पंचायत समितीचा अजब कारभार

दिव्यांग योजनांप्रमाणे शासकीय आदेशही फक्त कागदोपत्री अमळनेर पंचायत समितीचा अजब कारभार

अंमळनेर प्रतिनिधी: शासनाकडून दिव्यांगांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात त्यावर शासन निर्णयही पारित होतो परंतु काही ठिकाणी या निर्णयाची पायमल्ली देखील केली जाते. अमळनेर तालुक्यातील काही ग्रामपंचायत दिव्यांग निधी खर्च करण्यात निसमर्थी ठरल्या असल्याची माहिती प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी कागदोपत्री सिद्द करून त्या बाबत मोजक्या ग्रामपंचायत यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून तक्रारी केले असताना जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आदेश प्राप्त होऊनही पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडून या तक्रारींवर आज तागायत कोणतीही कारवाई केली जात नाही शिवाय विरिष्ठांचे आदेश मिळूनही त्यांच्या आदेशाची कोणतीही दखल न घेता आदेशांचे व नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे.

प्रहार संघटनेकडून तक्रारी सोबत पुरावे सादर करूनही पुरावे मागणी केले जात आहेत. अमळनेर पंचायत समितीचा अजब गजब कारभार बाबत आपला अहवाल मा. ना.बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री यांच्याकडे लवकरच सादर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे