महाराष्ट्र

सकल धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा जाहीर सत्कार, एस टी आरक्षण व धनगर समाजाच्या मागण्याचे निवेदन

एसटी आरक्षणासाठी व इतर मागण्यांसाठी जे जे काय करता येईल ते सर्व करण्यास मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या परीने सर्व करीन असे त्यांनी जाहीर आश्वासन दिले..


ठाणे (झूम मराठी) सकल धनगर समाजा तर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांचा जाहीर सत्कार करुन आरक्षण व धनगर समाजाच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांनी मुख्यमंत्री शिंदे यांना एसटी आरक्षणा संदर्भात निवेदन दिले. राज्यातील धनगर समाज बांधवांच्या विविध प्रश्न मांडण्यासाठी ठाणे मनपा माजी नगरसेवक योगेश जानकर यांच्या पुढाकाराने धनगर समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपस्थित राहून बहुसंख्येने जमलेल्या धनगर बांधवांशी संवाद साधला.

या प्रसंगी उत्तर महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी देखील एसटी आरक्षणासह एक हजार कोटी व आदिवासींच्या सवलती प्रमाणे युती शासनाने पदमश्री खा.डॉ. विकासजी महात्मे यांच्या पुढाकाराने लागू केलेल्या बावीस योजना यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्या विषयी लेखी निवेदन दिले. तसेच मेंढपाळांवर होणारे हल्ले या विषयी ॲक्ट्रॉसिटी वर आधारित कायदा करावा व धनगर बांधवांना बंदुकीचे परवाने द्यावे. याप्रकारे अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या मा. मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांचे निवेदन स्वीकारून आयोजक योगेशजी जानकर यांनी मांडलेल्या सर्व मागण्याचा योग्य तो विचार केला जाईल, आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्या तिन्ही बांधवाना दहा लाख रुपये व घरातील एकाला नोकरी देण्यात येईल व समाज प्रतिनिधी यांच्या बरोबर चर्चा करुन एसटी आरक्षणासाठी व इतर मागण्यांसाठी जे जे काय करता येईल ते सर्व करण्यास मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या परीने सर्व करीन असे त्यांनी जाहीर आश्वासन दिले.

यावेळेस त्यांना घोंगडी काठी व धनगरी ढोल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ/ठाणे जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रातील धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या परिसरातील समाज बांधव, महिला भगिनी आपल्या मागण्या घेऊन आलेले होते. धुळे येथील पंचायत समिती सभापती प्रा.विजय पाटील, श्री पंडित परदेशी, रमेश आबा परदेशी, रवींद्र फकीरा परदेशी, संदीप पांढरे, गणेश विठ्ठल गढरी, सुनील मनोरे, राजेंन्द्र गढरी, निंबा गढरी, संजय गेंदा परदेशी, मधुकर हजारे, मोर्यप्पा मोठे, प्रभाकर गढरी, विठ्ठल परदेशी (नानावटी), सुनिल सुर्यवंशी, राकेश परदेशी, सुरेश गढरी, मधुकर पाटील, आर्दश पाल समाजाचे रामसरय्या पाल, राजनाथ पाल, अवदेश पाल, रमेश कुरबा, यांच्यासह अनेक धनगर समाज बांधवांनी मेहनत घेतली यावेळेस बसची व्यवस्था करण्यात आली होती. बदलापूर येथील बसला मा नगरसेविका प्रमिलाताई पाटील तर कल्याण येथील बसला माजी उपमहापौर उमेश म्हात्रे तर ठाणे येथील बसला ज्येष्ठ समाजसेवक पंडित परदेशी यांनी श्रीफळ वाढवून शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाला महिला भगिनी ही मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर आलेल्या सर्व धनगर समाज बंधु भागिनींचे श्री रमेश आबा परदेशी यांनी आभार मानले व दोन दिवसातच सर्व उपस्थित राहीले म्हणून धन्यवाद दिले, अशीच एकजूट कायम ठेवा व समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात मोठ्या संख्येने उत्साहाने सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे