आपल खान्देश

ब्रिटिश कालीन पाचोरा-जामनेर पिजे कायम स्वरूपी बंद होणार!

पिजे बचाव कृती समितीने आदोलनाचा ईशारा दिला आहे

पाचोरा : येथील पाचोरा ते जामनेर ब्रिटिश कालीन नॅरो गेज वर चालणारी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव पाचोरा जामनेर पिजे ही आता कायमस्वरूपी बंद झाली आहे. असल्याचे पत्र अपर मंडल रेल्वे प्रबंधक प्रशासकीय भुसावळ यांनी बचाव कृती समितीला पाठवलेले आहे.

करोना महामारीत पाचोरा जामनेर पिजे सुरू करण्यासाठी खा उन्मेष पाटील व खा रक्षा खडसें यांचे अपयश झाले आहे. केंद्र सरकारने पाचोरा जामनेर वाशियाचा इतिहास पुसलेला असून या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना मध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

सविस्तरपणे वृत्त असे की गेल्या दोन वर्षांपासून लॉकडावुन मुळे सर्व रेल्वे गाड्या बंद करण्यात आले होते. या काळात केंद्राने  शासकीय मालमत्ता खाजगीकरण करून घेतले आहे, करोनाची परिस्थिती हळूहळू सुरळीतपणे झाल्या नंतर रेल्वे गाड्या सुरू होत असून पाचोरा जामनेर पीजी देखील सुरू करण्यासाठी पाचोरा कृती समिती तयार करून या समितीने सर्व पक्षीय बैठक घेऊन खा उन्मेष पाटील आ किशोर पाटील व भाजपा चे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी एकत्र येऊन पिजी सुरू करण्याची मागणीचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत खा उन्मेष पाटील यांनी पिजे बंद होणार नाही ती बंद झाली तर माझे अपयश असेल असे सांगितले होते. त्या मुळे पिजी बंद होणार असल्याची अफवा पसरवली जात असून कोणीही अफवेवर विश्वास ठेवू नका असे आव्हान केले होते. मात्र ५ जानेवारी २०२२ रोजी पाचोरा पिजे बचाव कृती समितीला अपर मंडल रेल्वे प्रबंधक प्रशासकीय भुसावळ यांनी पत्र पाठवलेले आहे, की ही पिजी कायमस्वरूपी बंद झाली आहे. आता कृती समितीने आदोलनाचा ईशारा दिला असून प्रवाशांनी जनतेच्या हितासाठी सहभाग घेण्याची गरज आहे

पिजे बचाव कृती समितीने आदोलनाचा ईशारा दिला असून अध्यक्ष, खली दादा देशमुख, कार्याध्यक्ष, अविनाश भालेराव, खजिनदार, पप्पू राजपूत, उप अध्यक्ष, भरत खंडेलवाल, विकास वाघ, पप्पू बाविस्कर, नंदू सोनार, ॲड भोईट अण्णा, अरुण पाटील सर यांच्या उपस्थितीत मीटिंग संपन्न झाली

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे