महाराष्ट्र

मोठी बातमी..पोलिस ठाण्यांमधील सीसीटीव्हीत आता ‘ऑडिओ’ रेकॉर्डिंग

सोलापूर (वृतसंस्था) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यांमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबतच ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा सुरू केली जाणार आहे. सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांमध्ये तशी सोय करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात अधिकारी व फिर्यादी, पोलिस व आरोपी यांच्यातील संवाद व घटनांची वस्तुस्थिती वरिष्ठांना पडताळता येणार आहे. या नवतंत्रज्ञानामुळे लाच घेण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास सर्वसामान्यांना आहे.

पोलिस ठाण्यात फिर्याद द्यायला आल्यानंतर पोलिसांनी पैसे मागितले, अरेरावीची भाषा वापरली, व्यवस्थित वागणूक दिली नाही, पोलिसांनी मारहाण केली, पोलिसांनी फिर्याद घेतलीच नाही किंवा आम्ही म्हणतोय तशी फिर्याद घेतली नाही, असे आरोप अनेकदा केले जातात. त्याची चौकशी करताना काहीच पुरावे नसल्याने ते आरोप खरे असले तरीही वस्तुस्थिती समोर येत नाही. काहीवेळा खोट्या आरोपांमुळे पोलिस खात्याला बदनामीही सहन करावी लागते. अनेकदा पोलिस आणि फिर्यादीत वादावादी होते. यावर उपाय म्हणून आता शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यातच आता ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा असणार आहे. त्यामुळे लाच घेणे किंवा पैशांची मागणी करण्याचे प्रकार थांबतील, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पोलिस ठाण्यातील मारहाणीमुळेच आरोपीचा मृत्यू झाल्याचे प्रकार व आरोपदेखील केले जातात. या नवतंत्रज्ञानामुळे तसे प्रकार होणार नाहीत.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे