आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा लाईव्ह – प्रा गिरीष पाटील जिल्हा आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्काराने सन्मानित


पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील एम एम महाविद्यालयात कार्यरत क्रीडाशिक्षक प्रा गिरीष पाटील यांचा जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे जिल्हा क्रीडा आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार नुकताच देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी आमदार राजूमामा भोळे, जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ जयश्रीताई महाजन, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महासंघाचे सचिव श्री शालीग्राम भिरुड, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दीक्षित, महानगरपालिकेचे उपायुक्त श्री उदय पाटील, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र कोतकर,शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ प्रदीप तळवलकर , राजेश जाधव आदी उपस्थित होते.

प्रा गिरीष पाटील हे पाचोरा येथील एम एम महाविद्यालयत क्रीडा शिक्षक व तालुका क्रीडा समन्वयक म्हणून कार्यरत असून त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना जिल्हा क्रीडा आदर्शशिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाऊसो दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन नानासो संजय वाघ, व्हा चेअरमन नानासो व्ही टी जोशी, कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे चेअरमन नानासो सुरेश देवरे, जेष्ठ संचालक डॉ जयवंत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य वासुदेव वले , उपप्राचार्य जी बी पाटील, पर्यवेक्षक एस एम पाटील, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख प्रा राजेश मांडोळे, भडगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वास साळुंखे , गो से हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री सुधीर पाटील , प्रा संदीप पवार तसेच सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे