गुन्हेगारीब्रेकिंग

‘बुली बाई’ ऍप : पोलिसांनी बेंगळुरूच्या व्यक्तीला घेतले ताब्यात

– महिलांना टार्गेट करणाऱ्या ‘बुली बाई’ अप्लिकेशन संदर्भात बेंगळुरू येथून २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी सोमवारी दिली.21 वर्षीय संशयिताला सायबर सेल मुंबईत आणत आहे.

एएनआय इनपुटने सांगितले की, पोलिसांनी संशयिताची ओळख उघड केलेली नाही, हा आरोपी बेंगळुरूमधील सिव्हिल इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री (शहरी) सतेज पाटील म्हणाले की, सध्या जास्त तपशील सांगता येणार नाहीत कारण त्यामुळे सध्या सुरू असलेल्या तपासात अडथळा येऊ शकतो. “मी सर्व पीडितांना खात्री देऊ इच्छितो की आम्ही सक्रियपणे गुन्हेगारांचा पाठलाग करत आहोत आणि ते लवकरच कायद्याला सामोरे जातील, ” असं ते पुढे म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे