भडगाव – लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिरात जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकी या उपक्रमास उत्साहात प्रारंभ
शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांनी सावित्रीबाईंचा जीवनपरिचय करून देताना सावित्रीबाईंचे जीवन हे अतिशय प्रेरणादायी असुन त्यांचे विचार आपण अंगिकारायला हवे असे प्रतिपादन केले
लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव, जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकी या उपक्रमास उत्साहात सुरूवात
भडगाव (प्रतिनिधी) भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव या शाळेत आज आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती पासुन जिजाऊ ते सावित्री या उपक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे आकर्षक पोषाख तयार करून सावित्रीबाईंचा जीवनपरिचय अत्यंत सुंदर शब्दांत करून करून दिला इ.४ थी च्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या जीवनावर एक छोटीशी नाटीका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

सदर उपक्रमांतर्गत शाळेतर्फे आज पासून ते १२ जानेवारी २०२२ पर्यंत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन शाळेतर्फे करण्यात आलेले आहे…यात आरोग्य शिबिर, रंगभरणस्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर शुध्दलेखन स्पर्धा, कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या महिलांचा सन्मान अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे
शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांनी सावित्रीबाईंचा जीवनपरिचय करून देताना सावित्रीबाईंचे जीवन हे अतिशय प्रेरणादायी असुन त्यांचे विचार आपण अंगिकारायला हवे असे प्रतिपादन केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षक ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.



