चाळीसगाव – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकर्पण जल्लोषात संपन्न
भव्य दिव्य असा आश्वरूढ पुतळाचे चाळीसगाव शहरात अनावरण झाल्याने शिवप्रेमीनी आनंदोत्सव साजरा केला
झूम मराठी वृत्तसेवा
चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार छत्रपती संभाजीराजे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी मंत्री आ. गिरीश महाजन, खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार मंगेश चव्हाण आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य असा आश्वरूढ पुतळाचे चाळीसगाव शहरात अनावरण झाल्याने शिवप्रेमीनी आनंदोत्सव साजरा केला. सोहळ्यानिमित्त शहर भगवेमय झाले होते. ठिकठिकाणी रांगोळी काढून महाराजांना मानवंदना देण्यात आली. शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांचा जय जयकार करत एकच जल्लोष व्यक्त केला. आज सकाळी शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. तरुणांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभाग घेऊन महाराजांचा जयजयकार केला.

गणिततज्ञ भास्कराचार्यांच्या या कर्मभूमीला पर्यावरणासह धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. ऐतिहासिक महापुरूषांची स्मारकं उभी करत असताना शहर रचनेच्या दृष्टीने फार विचार करावा लागतो. कारण ही स्मारकेच या शहराच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि अस्मितेचे मानबिंदू ठरत असतात. शहराची शोभा वाढवणारी व पर्यटकांच्या आकर्षणाची स्थळे बनतात. अशाच प्रकारचे श्री शिवछत्रपती महाराजांचे हे अश्वारूढ स्मारक चाळीसगाव नगरीचे भूषण ठरेल. या स्मारकाचे अनावरण करण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.अशी स्मारके गावोगावी उभारणे जसे गरजेचे आहे, तसेच त्यांची योग्य काळजी घेण्याची जबाबदारी सुध्दा आपली सर्वांची आहे असे खासदार संभाजी राजे यांनी बोलताना सांगितले.
याप्रसंगी खा संभाजी राजे तसेच विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांत पाटील, खा. रक्षाताई खडसे, गिरीश महाजन, आ.राजू भोळे, आ. एस.के.पाटील, आ. संजय सावकारे, आ.चंदुभाई पटेल यांच्यासह हे स्मारक उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण तसेच अमोल शिंदे, लक्ष्मण शिरसाठ, आप्पा कुडेकर, बापू शिरसाठ, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, नगराध्यक्षा आशालता पाटील, पालिका नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, शिवभक्त व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


