राहुल महाडिक रायगड जिल्हाप्रतिनिधी
महाड :- महाड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाड तालुक्यातील एका गावच्या महिला सरपंचाचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान महिला सरपंचाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस विविध अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने बलात्कार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.
मयत महिला सरपंचाच्या डोक्यावर लाकडासारख्या वस्तूने जोरदार प्रहार करण्यात आला आहे. घटनास्थळी त्यांना फरफटत आणल्याच्याही खुणा सापडल्या आहेत. त्यामुळे अन्य ठिकाणी त्यांची हत्या करुन मृतदेह जंगलात टाकल्याचा अंदाज आहे. सरपंच सकाळी चुलीसाठी लाकडं गोळा करायला घराबाहेर पडल्या होत्या, मात्र दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका व्यक्तीला जंगलात त्यांचा मृतदेह आढळला. त्याने पोलीस पाटलांच्या माध्यमातून महाड पोलिसांना याविषयीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन महिला सरपंचाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. महाड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अज्ञात इसमाने डोक्यात फाटा मारून त्यांचा खून केला असून मृतदेह विवस्त्र असल्याने अतीप्रसंग अगर बलात्काराचा संशय व्यक्त केला जात आहे. महाडचे पोलीस अधिक्षक, तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा