आपल खान्देश

पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव

पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गौरवकरण्यात आला

झूम मराठी पाचोरा – तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गो. से . हायस्कूल मध्ये जाऊन शिक्षक व शिक्षिका यांचा सत्कार करून गुणगौरव केला.

याप्रसंगी नगरसेविका सौ. सुचेता ताई वाघ जिल्हा महिला प्रवक्ता मा. श्रीमती मंगला शिंदे, तालुकाध्यक्ष श्रीमती रेखा ताई देवरे, जि. प. सदस्य स्नेहा ताई गायकवाड डॉ. सौ सुनिता मांडोळे सरलाताई पाटील सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्ष प्रा. वैशाली बोरकर यांनी उपस्थिती देऊन मुख्याध्यापक श्री. सुधीर पाटील उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम .वाघ, पर्यवेक्षक श्री. आर. एल. पाटील श्री. एन. आर. ठाकरे ,श्री. ए. बी. अहिरे, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख श्री. मनीष बाविस्कर, कार्यालय अधीक्षक श्री. अजय सिनकर, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस. एन .पाटील, ज्येष्ठ शिक्षक श्री. आर. बी. तडवी ,श्री .बी. एस. पाटील, सौ ए .आर. गोहिल, सौ. सी. बी. सूर्यवंशी, श्रीमती. एस . एस पाटील, श्री .डी .डी. विसपुते ,श्री .मयूर देवरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्रीमती मंगला शिंदे डॉ. सौ. सुनिता मांडोळे, मा. कुमारी स्नेहा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले व मनोगतातून विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाची भूमिका किती महत्वाची आहे हे सांगितले कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .बी. एस .पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्री.डी. डी. विसपुते यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय पाटील, सागर महाजन व गौरव सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे