गुन्हेगारीमहाराष्ट्र
चलाख महिला अधिकाऱ्याने लाच घेण्यासाठी चालकाला पाठवले मात्र ‘ असाही ‘ मास्टरप्लॅन होता
एका संस्थेकडून 8 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांना अटक करण्यात आली आहे.
नाशिक, 11 ऑगस्ट: शाळांना मंजूर करण्यात आलेल्या 20 टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात एका संस्थेकडून 8 लाख रुपयांची लाच (8 Lakh Bribe) स्वीकारल्या प्रकरणी एका महिला शिक्षणाधिकाऱ्याला अटक (Woman education officer arrest ) करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर (Dr. Vaishali Zankar-Vir) यांच्यासह शासकीय वाहनचालक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे.



