आपल खान्देश

आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी जांभूळ फाटा, अंबरनाथ पश्चिम येथिल दंत महाविद्यालय कोविड सेंटरला दिली भेट.

अंबरनाथ >> अंबरनाथ शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावला आळा घालणे गरजेचे असून त्याकरिता अंबरनाथ नगरपरिषदेचे वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना व बाधितांना योग्यती आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता रविवारी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी जांभूळ फाटा, अंबरनाथ पश्चिम येथिल दंत महाविद्यालय कोविड सेंटर ला भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली. 

तसेच कोरोना बाधितांची वाढत्या संख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून अंबरनाथ पूर्व भागातील वडवली परिसरातील एम.पी.एस.सी.प्रशिक्षण केंद्र, अंबरनाथ पश्चिम येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यां समवेत चर्चा केली. 

याप्रसंगी शहरातील नागरिकांकरिता कोविड लसीकरणाची संख्या वाढवणे गरजेचे असून दिवसाला किमान एक हजार जनांना लसीकरण करण्यात यावे,

शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता उपक्रम राबवण्यात यावे याकरिता कार्यवाही करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष श्री.सुनिल चौधरी, नगरपरिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी श्री.धिरज चव्हाण, नोडल अधिकारी डॉ. नितीन राठोड आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे