कोकण वृत्त
चिपळूण (शांताराम राणे) दोन दिवसापूर्वी चिपळूच्या कोलकेवाडी इथल्या कालव्यात चौघे बुडाले. यातील दोघांना वाचविण्यात यश आले, पण दोघे मात्र बुडालेच. या दोघांमध्ये एक होता सुजय संजय गावठे.
सुजयचे हे जाणे त्याच्या कुत्र्याला अगदी असह्य झाले. संजयने तीन वर्षे या कुत्र्याला अगदी प्रेमाने सांभाळले. हा कुत्रा अगदी कासावीस झाला. सुजयला पहायला तो सारखा कालव्याच्या ठिकाणी येत होता. सारखा तिथेच घुटमळत होता. तोंडातून आवाज काढत सुजयला बोलवित होता.
अखेर सुजयच्या विरहाने या त्याच्या कुत्र्यानेही मान टाकली आणि तिथेच अखेरचा श्वास घेतला. एका मुक्या प्राण्याचे आपल्या प्रेमाच्या माणसावर केलेले हे जीवापाड प्रेम पाहून लोकांचेही डोळे पाणावले. सगळ्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा