आपल खान्देशमहाराष्ट्र

युनोच्या युनेस्कोने (UNESCO) अहिराणी भाषेची घेतली दखल

आपण सर्व अहिर बांधव गेली अनेक वर्षे आपली मातृभाषा अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा म्हणून लढत आहोत. त्याची पहिली लढाई आपण जिंकली आहे. आपली ही कैफियत युनोत पोहचली आहे. युनेस्कोने अहिराणीची दखल घेतली आहे.

श्री विकास पाटील सर  उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष

जळगाव (दिलीप परदेशी )खानदेशी अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा  मिळावा म्हणून उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ  व अहिराणी साहित्यिकांचा  लढा सुरु आहे. या लढ्याला पहिले यश मिळाले आहे. हा लढा युनोत पोहचला आहे. युनोच्या युनेस्कोने (UNESCO) अहिराणी भाषेची दखल घेतली आहे. तसे अहिराणीचे गौरव करणारे पत्रही पाठविले आहे. यामुळे अहिराणी भाषेला मोठा पाठबळ मिळाले असल्याचे उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले.

केंद्र सरकारचे भारतीय बोलीभाषा संवर्धन करणारे कार्यालय बंगलोर येथे आहे. त्या केंद्राच्या अधिकारी श्रीमती काटजू आहेत. त्यांनी पहिले विश्व अहिराणी सम्मेलनाची नोंद घेतली. शासकीय पातळीवर अहिराणी भाषा कार्यक्रमाची ही पहिली अधिकृत नोंद झाली आहे. त्यांनी पहिल्या अहिराणी भाषा विश्व संमेलनातील सर्व कार्यक्रमाच्या क्लिप त्यांच्या वेब साईटवर टाकल्या. या सर्व क्लिप्स व अहिराणी भाषेची माहिती युनेस्कोकडे पाठवल्या होत्या.

युनेस्कोकडून भाषांचे जतनयुनोचा एक भाग असलेली ही युनेस्को संस्था जगातील भाषांचे जतन करण्यासाठी कार्य करीत आहे. त्यासाठी युनेस्कोचे एक स्वतंत्र खाते आहे. जे Linguapax international in official partnership with unesko (consulitative status) या नावाने ओळखले जाते. या संस्थानी पहिल्या विश्व अहिराणी संमेलनाची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा अभ्यास केला. संमेलनात सर्व ठरावांची दखल सुद्धा घेतली आहे. हा सर्व वृत्तांत त्यांनी न्यूयॉर्क मधील वृत्त पत्रात प्रसिध्दीसही दिल्याने ही भाषा असंख्य भाषा तज्ञांपर्यंत पोहचली आहे.

अहिराणी इंंडो-आर्यन भाषायुनोस्कोच्या पत्रात नमूद केले आहे, अहिराणी ही एक इंडो-आर्यन भाषा आहे. जी मूळतः महाराष्ट्र भारताच्या खान्देश प्रदेशात बोलली जाते. त्याचा दीर्घ इतिहास आणि समृद्ध चलन असूनही, ती भारतीय बांधणीच्या भाषा अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेली नाही आणि तिला कोणतेही सरकारी संरक्षण मिळालेले नाही.अहिराणी भाषेला भारतीय भाषांच्या परिशिष्टात स्थान मिळावे म्हणून सूर केलेल्या लढाईस पहिले यश मिळालेय. याचे श्रेय या लढ्यातील सहभागी सर्व ज्ञात अज्ञात संघटना, व्यक्ती, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, त्यांच्या पदाधिकाऱ्याना आणि 2 कोटी अहिर बांधवांना जाते. आंतरराष्ट्रीय भाषा तज्ज्ञ पद्मश्री गणेश देवी सर यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन युनोच्या अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार केला असे झूम मराठीशी बोलताना विकास पाटील सर यांनी माहिती दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे