नगरदेवळा येथील १६ जणाविरोधात गुन्हा दाखल, जबर मारहाण केल्याने पोस्कोतील आरोपीची पाचोरा पोलिसात तक्रार!
झूम मराठी
पाचोरा(झूम मराठी) पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील पोस्कोतील आरोपी सुभाष महादू महाजन (५८) यांनी पाचोरा पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की दिनांक१२ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नगरदेवळा येथील आरोपी शेख मेहबूब शेख सईद, मौसीम सब्दार शेख,शाहरुख खान, मोनू आसिफ बेग,खलील युनूस पठाण,रफिक बागवान याचा मोठा मुलगा,इसरार हॉटेल चालकाचा मुलगा,जुनेद शेख आबीद,सादिक शेख रज्जाक शेख, इम्रान गफ्फार कुरेशी, शेख गुड्डू शेख अबिद, दिलावर इब्राहिम पठाण, शाहिद शब्बीर सय्यद, शब्बीर शेख सादिक, यतेशाम रशीद शेख, यासीन बेग शकील यांनी यातील आरोपी क्रमांक एकची मुलगी घरात येऊन माझ्या पलंगावर बसली असता तिच्या आईला वेगळाच संशय आल्याने वरील आरोपीनी हातात लोखंडी रॉड सळ्या घेऊन माझ्या डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत करून माझ्या घरात दगडफेक करून टीव्ही सह सामानाची तोडफोड करून नुकसान केली.
अशी फिर्याद पाचोरा पोलिसात दिल्याने वरील सर्व आरोपींविरोधात कलम ३२६, १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ३२३, ५०४, ४२७,नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.


