आपल खान्देश

Jalgoan | यावर्षीचा उत्कृष्ट कार्यालय पुरस्कार पाचोरा प्रांत कार्यालयाचा गौरव…

झूम मराठी ऑनलाईन | पाचोरा

पाचोरा प्रांत कार्यालया अंतर्गत झालेलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुका, आपत्कालीन, रेल्वे भुसंपादन, गौण खनिज कारवाई,  आदिवासी क्षेत्रातील वाडी, वस्ती आणि पाडा यांना महसुली गावांना दर्जा देणे या कामगिरी बद्दल उत्कृष्ट प्रांत कार्यालयाचा यावर्षीचा उत्कृष्ट कार्यालय पुरस्कार पाचोरा प्रांतअधिकारी भूषण अहिरे यांना  जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

या सन्मान सोहळा कार्यक्रमास जिल्हाधिकारी जळगाव यांच्यासह आयुष प्रसाद, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते  पाचोरा प्रांत पथकास सन्मानित करण्यात आले.

पाचोरा प्रांतअधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनात 

  • लोकसभा विधानसभा मतदार यादी अदययावत करणे दिनांक 01/01/2024 ते 31/03/2025 पर्यंत 55878 अर्जावर कार्यवाही करण्यात आली.
  • लोकसभा निवडणूक 2019 मतदान टक्केवारी :- 57.63 
  • विधानसभा निवडणूक 2019 मतदान टक्केवारी :- 63.62 
  • लोकसभा निवडणूक 2024 मतदान टक्केवारी :- 60.06 
  • विधानसभा निवडणूक 2024 मतदान टक्केवारी :- 68.70
  • भूसंपादन – NH-753 J- 19 प्रस्ताव 19.06 हे. आर संपादन क्षेत्र-17,43,37,381/- मोबदला वाटप, Railway- 11 प्रस्ताव -20A – अधिसुचना प्रसिध्द, मोबदला वाटप, जुवार्डी, अंचाळगाव-वसंत वाडी, या दोनही प्रस्तावात 3,31,61,587/- रक्कम वाटप करण्यात आली. कजाप- आदेश 33 पारित करणेत आले आहे.
  • गौण खनिज कारवाई जप्त vehicle आणि दंड. तालुका पाचोरा अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडण्यात आलेली वाहने संख्या 88 आकारलेला दंड रक्कम रुपये 12059052/, मात्र दंड भरून बंध पत्र घेऊन सोडलेली वाहने संख्या 49 वसूल दंड रक्कम रुपये 6271354/- 
  • तालुका भडगाव अवैध वाहतूक करताना पकडण्यात आलेली वाहने संख्या 94 आकारलेला दंड रक्कम रुपये 17774918 मात्र दंड भरना करून बंध पत्र घेऊन सोडण्यात आलेली वाहने संख्या 54 वसूल दंड रक्कम 10208504
  • जमीन विषयक बाबी (कंसात निर्गत प्रकरणांची संख्या) – बिनशेती परवानगी (116), बांधकाम, एकत्रिकरण व विभाजन परवानगी (97), मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय जागा मागणी प्रस्ताव (96), स्मशानभूमी / दफनभूमी जागा मागणी (2 आदेश पारीत व 33 प्रकरणे मोजणीवर), ब-सत्ता / न.अ.श. भुखंडांना विक्री, तारण व वर्ग-1 परवानगी (21), महसुल गावात रुपांतर (02 गावांचा प्रस्ताव सादर), शासकीय वसुलीबाबतचे प्रकरणे तातडीने निर्गत करणे, भाडेपट्टा नुतनीकरण, मानसिंगका कॉलनीतील अवसायनात गेलेली घरे सभासदांचे नावे लावणेबाबतचा प्रश्न, भडगांव नगरपरिषद हद्दीतील सुखी नदी जागाबाबत.
  • महसुली अर्ध- न्यायिक केसेस
  • अपील निकाली केसेस 82
  • ज्येष्ठ नागरिक कायदा निकाली केसेस 19
  • पाचोरा उपविभाग महसूल वसुली लक्ष 17 कोटी 15 लाख इतके होते तर प्रत्यक्ष 17 कोटी 92 लाख इतकी वसुली करण्यात आली… 104%
  • दंड विषयक कामकाज- AD cases मंजूर आदेश प्रकरणे 164
  • तडीपार – 04 प्रकरणे,
  • दारूबंदी प्रकरणे 96 अंतिम आदेश पारित,
  • शस्त्र परवाना नुतनीकरण (63)
  • जातीचे प्रमाणपत्र- एकूण जातीचे प्रमाणपत्र भील समाज 1800 दाखले , मदारी समाज 34, गोंड समाज 27
  • गृह चौकशी अहवाल वरून वरील दाखले देण्यात आले आहेत
  • एकूण देण्यात आलेले NCL प्रमाणपत्र
  • Pardhade Railway accident आपत्ती व्यवस्थापन बाबत सतत 2 दिवस पूर्ण वेळ महसूल विभाग कार्यरत होता.
  • संकलन विषयक बाबी- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करणे जानेवारी 2024 ते आज पावेतो संख्या (35), विविध विभागाकडून प्राप्त जात प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करणे जानेवारी 2024 ते आज पावेतो संख्या –(112),,, अभिलेख कक्षात अ,ब,क,ड नुसार वर्गीकरण केलेले संचिकेची संख्या – (3285)
  •  हिशोब संकलन विषयक बाबी- अलेप मध्ये अमुल्यांकीत प्रकरणात 26 अमुल्यांकीत परिच्छेदापैकी 15 परिच्छेद मान्य झालेले आहे.
  • अलेप -2 मध्ये माहे-2023 पासून ते 24 फेब्रुवारी 2025 पावेतो र.रु.258781/-इतकी वसुली करणेत आलेली आहे.

वरील सर्व कामकाजात नायब तहसीलदार कुंभार साहेब, अव्वल कारकून रेखा सोळंके, अव्वल कारकून कल्पना परदेशी, महसूल सहायक सुरेश सोळंके, महसूल सहायक चेतन सोळंके, महसूल सहायक राजिंद्रे, महसूल सहायक उमेश वाडेकर शिपाई, श्रावने, गुलाब पाटील, वाहनचालक, मनोज पाटीलया सर्वांनी वर्षभर केलेल्या उत्तम नियोजन व कामामुळे हा गौरव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे