आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

पुनावळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे “गो ग्रीन” उपक्रम 


पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी उमेश पाटील) मानवाचे संपूर्ण जीवन हे निसर्गावरच अवलंबून आहे आणि असे असताना देखील आज वातावरणाची अत्यंत बिकट अवस्था आहे. निसर्गाचक्रात झालेल्या बिघाडामुळे अवेळी येणार पाऊस, ग्लोबल वार्मिंग आणि विविध प्रकारच्या रोगराईचा सामना आज आपल्याला करावा लागत आहे. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन कोणत्या ना कोणत्या कार्यातून प्रत्येकाने करावे ही काळाची गरज आहे. हीच बाब लक्षात घेता पुनावळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ने गो ग्रीन उपक्रमाचे आयोजन केले आहे.

कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निसर्गसंवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे; परंतु जर हे कर्तव्य बजावताना त्यासाठी आपल्याला बक्षीस मिळाले तर? पुनावळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ने त्यांच्या गो ग्रीन उपक्रमात निसर्गाचे संवर्धन करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस हॉस्पिटल मध्ये सूट देण्याचे ठरवले आहे.

या उपक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांनी निसर्ग पूरक गोष्टी जसे की, झाडे लावणे, परिसराची स्वच्छता करणे आणि जनजागृतीपर व्हिडीओ अथवा कार्यक्रमाचे आयोजन करणे अशा गोष्टी करून त्याचे फोटो त्यांच्या फेसबुक अकाउंट वर #gogreenpunawalehospital ही टॅग लाईन वापरून टाकल्यास त्यांना हॉस्पटिल मधील मोफत ओपीडी तसेच कोणत्याही वैद्यकीय चाचण्या मध्ये १५% सवलत मिळतील तसेच कोणत्याही शस्त्रक्रियेच्या शुल्कात ३०% सवलत देण्यात येईल. 

या प्रसंगी अधिक माहिती देताना पुनावळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ राजकुमार निकाळजे म्हणाले, “गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचा पडलेला तुटवडा आपण पहिला तसेच यावर्षी गेल्या दशकातील सर्वात अधिक तापमान आपण अनुभवत आहोत. निसर्गाचे रौद्ररूप आपण सध्या पाहत आहोत तेव्हा आपल्या कडून निसर्गाची जपणूक व्हावी तसेच लोकांना देखील या कार्यात सामील करून घेण्यासाठी आम्ही गो ग्रीन हा उपक्रम आयोजित केला आहे.” हा उपक्रम संपूर्ण वर्षभर सुरु असेल तसेच पुण्यातील प्रत्येक भागातून सर्व लोकांना यात भाग घेता येईल असेही ते म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे