पाचोरा शहरातील जय किरण प्रभाजी शाळेत गोकुळाष्टमीचा उत्साह..
झूम मराठी
पाचोरा शहरातील जय किरण प्रभाजी शिक्षण sansइंग्लिश मेडीयम स्कुल मध्ये मोठया उत्साहात गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी शाळेत आले होते. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधाची वेशभूषा परिधान करत जन्माष्टमीचा उत्सवाचा आनंद लुटला, तसेच दहीहंडी फोडून, प्रसाद वाटप करत हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.


पाचोरा शहरातील जय किरणप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल येथे जन्माष्टमी आणि दही हंडी मोठ्या आनंदात आणि उत्साहाने साजरी करण्यात आली. शाळेच्या मैदानात हा उत्सव साजरा करण्यात आला. भगवान कृष्ण आणि दही हंडी यांच्या प्रतिमांसह या कार्यक्रमासाठी शाळेचे मैदान सुशोभित करण्यात आले होते. विद्यार्थीनी राधा आणि कृष्णाची वस्त्रे परिधान केली होती. शाळेच्या मैदानात दही-हंडी बांधण्यात आली. जन्माष्टमी गाण्यांच्या तालावर विद्यार्थी आणि शिक्षकांनी नृत्य केले यां शाळेत यावर्षी विध्यार्थीनी व शिक्षकांनी मोठया उत्साहात जन्माष्टमीचा उत्सवाचा आनंद लुटला, शाळेतील शिक्षिकानी विध्यार्थीनां गोपाळकाला या उत्सवाबद्दल माहिती सांगितली.

u

