आपल खान्देशब्रेकिंग

पाचोऱ्यात महावितरणकडून  ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याचा घाट, योजना रद्द करण्याची नागरिकांची मागणी…

झूम न्यूज नेटवर्क | दिलीप जय परदेशी

पाचोरा स्मार्ट प्रीपेड मीटरच्या (Smart Prepared Meter) नावाखाली जनतेची दिशाभूल करून आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप होतांना दिसत असून महावितरण विभागा विरोधात रोष व्यक्त होतांना दिसत आहे.

स्मार्ट मीटर पाचोरा, भडगाव तालुका तसेच पाचोरा-भडगाव शहरीभागात कुठेही स्मार्ट मीटर लावु नये, तसे केल्यास आम्ही शिवसेना पाचोराच्यावतीने महावितरण कंपनीच्या ठेकेदारांच्या स्मार्ट मीटर बळजबरीने बसविण्याच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आता पुन्हा शिवसेना स्टाईलने उत्तर देईल असे पाचोरा शिवसेनाने सांगितले..

महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट घातला जात आहे, चांगले मीटर काढून हे मीटर बसवण्यात येत असून, स्मार्ट मीटर ज्या ग्राहकांच्या घरी हे मीटर बसवले आहे त्यांचे युनिट जास्त फिरत असेल्याचे निदर्शनास आल्याने स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करावी, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले होते की, स्मार्ट प्रीपेड मीटर केवळ शासकीय कार्यालये आणि औद्योगिक वसाहतींमध्येच लावले जातील, सामान्य ग्राहकांना याचा कोणताही त्रास होणार नाही. मात्र, प्रत्यक्षात प्रत्येक घरगुती ग्राहकाच्या घरी हे मीटर बसवण्याचा सपाटा सुरू आहे, जे मंत्र्यांच्या आश्वासनाच्या पूर्णपणे विरोधात आहे, असा दावा समितीने केला. एकीकडे मीटरला विरोध होत असताना, दुसरीकडे “स्मार्ट प्रीपेड मीटर लावल्यास दिवसाला प्रति युनिट ८५ पैसे बिल कमी येईल” आणि “येत्या पाच वर्षांत घरगुती वीजदरात २३ टक्क्यांची कपात होईल,” अशी प्रलोभने सरकारकडून दिली जात आहेत. मात्र, ही केवळ धूळफेक असल्याची भावना जनतेमध्ये आहे.

ही योजना केवळ काही उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी आखली गेली असून, सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करण्याचा हा एक सुनियोजित कट तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

ग्राहकांच्या संमती शिवाय स्मार्ट मीटर बसवणे बंद व्हायला पाहिजे सर्व सामान्य नागरिकांची मागणी असून वितरण आणि सरकार यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे