घोसला हे कोवीड लसीकरणाचे दोन्ही डोस शंभर टक्के पूर्ण झाले गाव!.
सोयगाव तालुक्यातील घोसला गाव जिल्ह्यात अव्वल क्रमांकाच्या पारितोषिकासाठी पात्र ठरणार प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी.
घोसला येथे रात्री ऊशीरापर्यंत कोवीड लसीकरण पुर्ण करुन घेणारे पथक
झूम मराठी वार्ता
सोयगाव तालुक्यातील घोसला गाव जिल्ह्यात अव्वल क्रमांकाच्या पारितोषिकासाठी पात्र ठरणार प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी…
शासनाच्या कोवीड लसीकरणाच्या ‘हर घर दस्तक’ आणि ‘मिशन कवचकुंडल, या दोन्ही योजनेअंतर्गत घोसला गावाला सोमवारी रात्री उशिरापर्यंत कोवीड लसीकरणाचे दोन्ही डोस शंभर टक्के पूर्ण झाले. यामुळे घुसला गाव लसीकरण मुक्त झाल्याची घोषणा तहसीलदार रमेश यशवंत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीनिवास सोनवणे व बी.डी.ओ.आहीरे सर यांनी संयुक्तपणे केली आहे. या घोषणेमुळे घोसला गावाला जिल्ह्यात अव्वल होण्याचा बहुमान पटकाविला जाणार आहे…

कोवीड लसीकरणासाठी घोसला गावात पहिल्या आणि दुसर्या डोससाठी साठी तब्बल बाराशे लाभार्थी पात्र होते यापैकी आता पहीला डोस १२४३ व दुसराडोस हा १२८५ अश्या स्वरुपात या सर्व लाभार्थ्यांना सोमवारी रात्री उशिरापर्यंत आरोग्य पथकाने लसीकरण करून शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. आता घोसला हे गाव २५ टक्के वाढीव निधी साठी पात्र ठरले असून गावात एकही १८वर्षावरील ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित राहिलेला नाही.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत घोसला येथील लसीकरण सुरू होते त्यामुळे २७८ जणांना लसीकरण झाल्याची माहिती हाती आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीनिवास सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण पथकाच्या डॉक्टर चव्हाण अनिल जोहरे राहुल दांडगे अनिल महाजन आशा सेविका मंदाबाई अनिल पाटील, स्वयंसेविका मिनाबाई आनंदा पाटील छायाबाई गवळी आदींनी रात्री उशिरापर्यंत लसीकरणासाठी पुढाकार घेतला होता.
ग्रामपंचायतीचे पथक ठाण मांडून होते. घोसला लसीकरण स्थळी तलाठी कुलट अप्पा, सरपंच सुवर्णा न्यानेश्वर पाटील, उपसरपंच सुभाष गंगाराम पाटील,पवित्रा ज्ञानेश्वर पा.प्रतिभा पा.अलका बाई संजय पा.प्रतिभा, दिपक गवळी, सोमु तडवी, गणेश माळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आदींचे पथक लसीकरण स्थळी ठाण मांडून बसले होते. शेतातून आलेल्या मजुरांना लसीकरणासाठी अआनन्या चे काम ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी केले. डॉक्टर श्रीनिवास सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी घोसला येथे सोमवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या 100% लसीकरणाचा आव्हाल आम्हाला प्राप्त झाला असून तो जिल्हा परिषदेला पाठवण्यात येईल व त्यामुळे घोसला येथील दोन्ही लसीकरण डोस पूर्ण केल्याबद्दल पारितोषिकासाठी पात्र करण्यास अहवाल पाठवण्यात येईल.



