कोल्हापूर जिल्ह्यातील विश्वकर्मा समाज मंदीर तोडफोड प्रकरणी पाचोरा तहसीलात निवेदन.
झूम मराठी वृत्त
पाचोरा (प्रतिनिधी)कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी नजीक असणाऱ्या कनुर येथील सुतार गल्लीतील विश्वकर्मा समाजाचे विश्वकर्मा समाज मंदीर काही समाजकटंक लोकांनी समुहाने एकत्रीत येऊन सुतारगल्ली मध्ये दहशत माजवत येथे असणाऱ्या समाजमंदिराची तोडफोड केली त्या विरोधात त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी पाचोरा येथील श्री विश्वकर्मा बहुउद्देशिय संस्थाच्या वतीने पाचोरा प्रांतधिकारी व पोलीस स्टेशन कार्यालयात निवेदन देण्यात आले.

सविस्तर काय आहॆ प्रकरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी नजीक असणाऱ्या कनुर येथील सुतार गल्ली येथील विश्वकर्मा समाजाचे विश्वकर्मा समाज मंदीर, दि 23/7/2022 रोजी रात्री 1.30 च्या सुमारास काही समाजकटंक लोकांनी समुहाने एकत्रीत येऊन सुतारगल्ली मध्ये दहशत माजवत येथे असणाऱ्या समाजमंदिराची मोडतोड केली. यात प्रचंड नुकसान केले आहे. या लोकांवर स्थानिक पोलिस ठाणे मध्ये गुन्हा दाखल केला आहे.विश्वकर्मा समाजमंदिर ही आमच्या समाजाची अस्मिता आहे. याचे पडसाद पुर्ण महाराष्ट्र भर उमठु शकतात. सदर लोकांनवर तक्रार केली म्हणून व तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. कबनूर व इचलकरंजी येथील आमच्या समाजबांधवाच्या जीवितास धोका आहे. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपीवर कडक कारवाई लवकरात लवकर व्हावी अन्यथा सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात करण्यात येईल.
अरुण रघुनाथ मिस्तरी, भगवान मिस्तरी,मनोज आहिरे ,राकेश सोनवणे सचिन गायकवाड,अमोल गायकवाड,किरण मिस्तरी,प्रविण मिस्तरी,मुकेश मिस्तरी,ज्ञानेश्वर निकम समाज बांधव उपस्थित होते.



