इंडिया सिंगिंग सुपरस्टार ऑफ बुर्हानी, आठवीतील विद्यार्थिनी धनश्री कुलकर्णी हिने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला
इंडिया सिंगिंग सुपरस्टार ऑफ बुर्हानी.
अँड टीव्ही आणि ब्लूबेरी इंटरनॅशनल ग्रुप आयोजित इंडिया सिंगिंग सुपरस्टार स्पर्धा लखनऊ येथे घेण्यात आली होती, या स्पर्धेमध्ये बुर्हानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कुमारी धनश्री विनोद कुलकर्णी हिने गाण्यांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.

पाचोरा शहरातील बुर्हानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कुमारी धनश्री विनोद कुलकर्णीला रोख रक्कम 50 हजार रुपये चा चेक गोल्ड ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी सिद्धि विनोद कुलकर्णीने देखील टॉप टेन मध्ये आपले स्थान मिळवले ट्रॉफी व प्रमाणपत्राची मानकरी ठरली. सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत संस्थेचे चेअरमन श्री ताहेरभाई कपाशी व व्हाईस चेअरमन श्री मुस्तफाभाई लाकडावाला यांनी यशस्वी गायकांचे ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन पुनश्च सत्कार केला. या सर्व कलाकारांचे बुर्हानी व्यवस्थापन व स्टाफ च्या वतीने शब्द सुमनाने कौतुकही करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आणि विजेत्या गायकांच्या सुमधुर गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.



