आपल खान्देश

जळगाव छत्रपती संभाजी नगर महामार्गावर खड्यामुळे अपघातांची मालिका सुरूच.

पहूर , ता .जामनेर ( ता . १२ ) जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून डंपर वर आयशर धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , राष्ट्रीय महामार्गावर पहूर नजीक खड्डेच खड्डे असून अपघातांची मालिका सुरूच आहे . रेल्वे रुळानजीक डंपर वर आयशर धडकल्याने झालेल्या अपघातात विष्णू प्रभाकर मुंडे ( वय २३ ) हा आयशर चालक स्टेरिंग मध्ये अडकल्याने छातीला गंभीर दुखापत झाली . अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेचे पायलट अमजद खान डॉ. लियाकत अब्बासी यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे