महाराष्ट्र
आनंददायक: नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच.. या महिन्यात होणार चाचणी !
नाशिक (प्रतिनिधी): अनेक दिवसांपासून नाशिककरांची मागणी असणारी नाशिक ते कल्याण लोकल सेवेची चाचणी येत्या डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. यामुळे कनेक्टिव्हीटीला चालना मिळणार असून नाशिक ते कल्याणपर्यंत असणारी सर्व स्थानके या लोकलमुळे कनेक्ट होणार आहेत.
यामुळे विद्यार्थी, शेतकरी, प्रवासी सामान्य नागरिक नोकरदार यांचा प्रवास सुखकर होणार आहे.नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस उलटत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली.




