जळगाव खासदार स्मिता वाघ यांची युगपुरुष व .सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) समितीने घेतली भेट

जळगांव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांची युगपुरुष व.साखर कारखाना नवनिर्माण (पुनरुज्जीवन) समितीने अमळनेर येथे जाऊन भेट घेतली आणि सदर समितीची केंद्र शासनाबरोबर बैठक लावण्याचाही शब्द दिल्या बद्दल समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
सदरील भेटीसाठी आपले कासोदा येथील भाजपा पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य नरेश ठाकरे, खडके येथील भा.ज.पा.ता. अध्यक्ष व सरपंच राजूदादा पाटील यांनी प्रयत्न केलेत. राज्यात सार्वजनिक निवडणूकीच्या धामधुमीत सदरील बैठक अवघड होती पण दोन्ही दादांच्या सततच्या प्रयत्नांनी यशस्वी झाली. सदरील बैठकीला राजूदादांना कौटुंबिक कार्यक्रमामुळे प्रत्यक्षात हजर राहता आले नाही पण त्यांच्या पाठपुरावा मात्र यासाठी सतत सुरू होता.
आमची युगपुरुष व.सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) समिती पदाधिकारी व नरेश दादांनी मिळून ताईसाहेबांची भेट घेतली व निवेदन देवून सखोल चर्चा केली. त्यामध्ये ताईसाहेबांना संपूर्ण विषय समजावून सांगितला व खासदार स्मिता वाघ यांनी देखील समितीला काही प्रश्न विचारले. सोबत सदरील काम परिपूर्ण होण्यासाठी ताईसाहेबांनी समितीला काही सुचना केल्यात व त्यांची पुर्ततः झाल्यावर समितीची केंद्र शासनाबरोबर बैठक लावण्याचाही शब्द दिला.अशा प्रकारे अतिशय आनंदी वातावरणात सदरील बैठक संपन्न झाली. या पध्दतीने आपला युगपुरुष व. सा.का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) विषय समितीने केंद्र शासनापर्यंत पोहचविला असून आनंद व्यक्त होतांना दिसत आहे.



