महाराष्ट्र

ग्लोबल टीचर सुनील म्हसकर हे ‘वसंतस्मृतीने सन्मानाने सन्मानित

ग्लोबल टीचर सुनील म्हसकर हे ‘वसंतस्मृती सन्मान,२०२१’ या विशेष सन्मानाने सन्मानित … शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर,२०२१रोजी टीप-टॉप प्लाझा, ठाणे येथे भारतीय जनता पार्टीच्या कोकण विभाग शिक्षक आघाडी आयोजित ‘वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१’ हा अतिशय भव्य असा सन्मान सोहळा संपन्न झाला! यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकार, केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब, खासदार रामशेठ ठाकूर साहेब, आमदार संजयजी केळकर साहेब, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट निरंजन डावखरे साहेब, आमदार विनय नातू साहेब, ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी शेषराव बढे साहेब, विकास पाटील सर, एन. एम.भामरे सर, सुधीर घागस सर, श्रीरंग विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन तावडे सर आदी मान्यवर तसेच कोकण विभागातील ३०० हून अधिक असे अनेक उपक्रमशिल व गुणवंत शिक्षक उपस्थितीत होते. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या शुभहस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीरंग एज्युकेशन सोसायटीच्या श्रीरंग विद्यालय ठाणे येथील सहशिक्षक सुनील म्हसकर सर यांस ‘वसंतस्मृती सन्मान,२०२१’ या विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले! सरांना, मागील वर्षी ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड,२०२०’ या जागतिक पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे! विशेष बाब म्हणजे त्यांचे उल्लेखनीय शैक्षणिक कार्य पाहता, सदर कार्यक्रमात १३० सत्कारमूर्तींपैकी पहिल्या दहा सत्कारमूर्तीत केंद्रीय मंत्री माननीय कपिल पाटील साहेब यांच्या शुभहस्ते त्यांस विशेष पुरस्काराने गौरविण्यात आल्याने सरांना खूपच आनंद झाला आहे! त्याबाबत सुनील म्हसकर सर यांचे त्यांच्या विद्यालयातून, पाली गावातून, त्यांच्या स्वामी विवेकानंद संस्थेकडून तसेच समजातील विविध घटकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे!

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे