ब्रेकिंग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवेची मल्हार आर्मी कडून स्वछता.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवेची मल्हार आर्मी कडून स्वछता.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानभर लोककल्याणकारी कार्य केली होती.त्यांनी 1764 साली तुळजापूर शहरात भाविक-भक्तांसाठी बारव बांधली होती,त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे या बारवेला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले होते.ही बाब लक्षात आल्यानंतर मल्हार आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक घेऊन आज मंगळवारी बारव स्वछता मोहीम आयोजित केली होती.या मोहिमेत सहभागी होऊन ही बारव पूर्ण स्वच्छ केली गेली आहे.

तुळजापूर शहरात असलेला हा एवढा मोठा ऐतिहासिक वारसा शहर वासीयांनी जपायला हवा,परत इथे कचरा टाकू नये म्हणून प्रशासनाने उपाययोजना करायला हव्यात ही जनतेतून मागणी होतं आहे.या स्वछता मोहिमेत आण्णा बंडगर,समर्थ पैलवान,प्रमोद दाणे,वैभव लकडे,समाधान पडुळकर,सचिन हाक्के,प्रतीक देवकर,सुमित पालवे,मल्लिकार्जुन सुलतानपुरे,लिंगप्पा गंज्याळी यांनी सहभागी होऊन ही स्वछता केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे