आपल खान्देश

खडकदेवळा बु।। येथे चंदन तस्करांचा धुमाकूळ; कारवाईची मागणी

खडकदेवळा बु।। येथे चंदन तस्करांचा धुमाकूळ; कारवाईची मागणी.

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील खडकदेवळा बु येथील शेतकरी बाबूलाल पांडुरंग चौधरी यांच्या शेताच्या बांधावर उगवलेले अनेक चंदनाचे झाडे होती.त्यात मागील काही वर्षांपुर्वीच पाच चंदनाची झाडे बुंद्यापासून आरीने कापून चंदन तस्करांनी लंपास केले होते. परत आज शेतातुन रात्रीच्या अंधारात चंदनाची झाडे चोरी केल्याची घटना सी.सी.टि.व्ही कॅमेरात कैद झाल्यानेच हि चोरी उघडकीस आली आहे.

या तस्करांनी चंदनाच्या इतरही पाच ते सहा झाडांना दोरी मारुन गेले आहेत म्हणजे ते झाडेही चंदन तस्कर कापून नेण्याचा तयारीत आहे. चंदनाच्या झाडांवर आरीने दोरी मारलेल्या खुणा स्पष्ट दिसून येत असून चोरून नेलेल्या चंदनाच्या झाडांचे बुंदे घटनास्थळावर दिसत आहेत. चंदनाच्या झाडांवर चोरट्यांनी हात साफ केले आणि फांद्या मात्र तेथेच फेकून देऊन पोबारा केला.यापूर्वी सुध्दा गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर उगवलेल्या अनेक चंदनाच्या झाडाची चोरट्यांनी कत्तल केली आहेत.अशा वेगवेगळ्या घटनेमुळे आता खडकदेवळा या परिसरात चंदन तस्कर सक्रिय झालेले असल्याचे समोर येत आहे.त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे