धोकादायक प्रकारच्या या डेंग्यूवर नियंत्रणासाठी केंद्राने राज्यांकरिता हेल्पलाइन सुरू करण्याचे निर्देश दिले असून, डास प्रतिबंधक फवारण्यांची मोहीम हाती घेण्याची सूचना केली आहे.
कोरोनाच्या जोडीने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या डेंग्यूने थैमान घातले आहे. याच दरम्यान चिंता वाढणारी दुसरी एक बातमी येते आहे. देशातील 11 राज्यांमध्ये डेंग्यूचे धोकादायक प्रकार आढळले आहेत.
यामध्ये सेरोटाइप दोन या डेंगूच्या धोकादायक विषाणूची अत्यंत वेगाने वाढ होत आहे. या डेंगू चे विषाणू महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा या राज्यांमध्ये आढळले आहेत.
थोडा पाऊस पडल्यानंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये सध्या डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत डेंगू चा हा विषाणू चिंताजनक असून सध्या महाराष्ट्रातही याचा प्रभाव वाढला आहे.
धोकादायक प्रकारच्या या डेंग्यूवर नियंत्रणासाठी केंद्राने राज्यांकरिता हेल्पलाइन सुरू करण्याचे निर्देश दिले असून, डास प्रतिबंधक फवारण्यांची मोहीम हाती घेण्याची सूचना केली आहे. यापुढील काळात राज्यांमध्ये गर्दी कमी करण्याचे उपाय आखण्याच्या सूचना देखील दिल्या असून, कोरोना कमी होत असतानाच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य विभाग चिंतित आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा