पाचोरा लॉयर्स असोसिएशनची स्थापना, अध्यक्षपदी एकमताने ज्येष्ठविधीज्ञ अँड अभय पाटील, सचिव पदी सुनील सोनवणे यांची निवड.
पाचोरा | झूम मराठी ऑनलाईन @ लक्ष्मण आबा सूर्यवंशी.
पाचोरा न्यायालयातील वकील सभासदांमध्ये निवडणुकीच्या कारणावरून मतभेद झाल्यामुळे पाचोरा येथे लोकशाही मानणाऱ्या अनेक वकिलांनी मिळून पाचोरा लॉयर्स असोसिएशनची नुकती स्थापना केली.
सदर संघटना नोंदणीसाठी या आसो .च्या वकिलांनी प्राधिकरणांकडे पाठपुरावा केला. तसेच महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल तसेच ऑल इंडिया बार कौन्सिल यांच्याकडे देखील त्यांनी त्या संदर्भातील पत्र व्यवहार केलेला आहे. पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी एकमताने ज्येष्ठविधीज्ञ अँड अभय शरद पाटील तर सचिवपदी अँड. सुनिल नवल सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे . उपाध्यक्षपदी अँड. रविंद्र अशोक ब्राम्हणे हे विराजमान झाले. आणि वाचनालय सचिव म्हणून अँड. अंकुश कटारे यांची नियुक्ती करण्यात आली. या संघटनेत सदस्य म्हणुन अँड. ज्ञानेश्वर लोहार, अँड. मुबारक पठाण, अँड. भाग्यश्री महाजन, अँड. अमजद पठाण, अँड. नरेंद्र डाकोरकर, अँड. करूणाकर ब्राम्हणे सदस्य आहेत. पाचोरा लॉयर्स असोसिएशनच्या स्थापना आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवड – नियुक्ती बद्दल पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन केले जात आहे. भविष्यात ज्युनिअर वकील आणि महिला वकील सदस्य यांचा सन्मान आणि व्यावसायिक वृद्धीसाठीकाम करण्याचं पदाधिकाऱ्यांनी मानस व्यक्त केला आहे.



