पाचोरा तालुक्यातील शिंदे गटातील जळगाव जिल्हाप्रमुख यांच्या गावात मृत दलित महिलेच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव!
पाचोरा (प्रतिनीधी)—तालूक्यातील निपाणे येथे दलित समाजातिल वृध्द महिलेच्या प्रेतावर अंत्यंसंस्कार करण्यास मज्जाव करणार्या मुख्यमंञी एकनाथ शिंदे गटाचे जळगाव जिल्हाप्रमुख व माजी जिल्हापरिषद सदस्य मनोहर उर्फ रावसाहेब पाटिल यांच्यासह ११ जणांवर अनुसूचीत जाती आणी अनुसूचीत जमाती कायद्याअंतर्गत पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेने संपुर्ण तालुक्यासह जिल्हा हादरला असुन अजुनही मागासलेल्या विचार सरणीवर जगणार्या लोकप्रतिनीधींच्या या कृत्याची समाजमनात चिड निर्माण होत आहे.पाचोरा पोलिसांनी कोणत्याही दबावात न येता गुन्ह्याचा तपास व चौकशी पारदर्शक व्हावी यासाठी पिडित कुटुंबातिल सदस्य व तालुक्यातिल सर्व ददलित संघटना विरोधिपक्ष नेते अजित पवार यांची उद्या भेट घेणार आहे.
याबाबत पोलिस सुञांकडुन मिळालेली माहीती अशी की, समाधान वामन धनुर्धर हे निपाणे येथिल रहीवाशी असुन त्यांची आई निलाबाई वामन धनुर्धर वय ६७ या सुरत येथे मुलीकडे गेल्या होत्या त्यांचे ११ सप्टेंबर रोजी राञी १०:३० वाजता सुरत येथेच वृध्दपकाळाने निधन झाले. सर्व नातेवाईक इकडेच असल्याने आईचा अंत्यसंस्कार निपाणे येथे करण्यासाठी आईचे प्रेत १२ सप्टेंबरला निपाणे आणले गेले.अंत्यविधीचा वेळ राञी १०:३० वाजेचा ठेवलेला असतांना तेंव्हा गावासह परिसरात पावसाने जोर धरला होता. अशा पावसात गावातिल जिल्हा परिषदेने बांधुन दिलेल्या नविन स्मशानभुमित सदरचा अंत्यंसंस्कार करण्याचे सर्वांनुमते ठरल्याने तेथे राञी अंत्यवीधीसाठी गेल्यावर लाकडे रचत असतांना माजी जिल्हापरिषद सदस्य मनोहर पाटिल, रोशन पाटिल, राजेंद्र पाटिल, ञ्यंबक पाटिल व भैय्या पाटिल यांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. रोशन पाटिल यांनी ही स्मशानभुमी तुमची नसुन आमची आहे. तर मनोहर पाटिल यांनी मला व माझे समाजाला ही स्मशानभुमी जिल्हा परिषदेने आमच्या समाजासाठी बांधलेली आहे.
गावकुशाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत तुमच्या आईला जाळा. इकडे आम्ही प्रेत जाळु देणार नाही. आमच्या समाजाच्या स्मशानभुमितुन प्रेत उचलून घेउन जा नाहीतर तुमचेही या मुर्द्यासोबत मुर्दे पाडु अशी धमकी दिली.
यावेळी समाधान धनुर्धर यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काही एक ऐकले नाही व धक्काबुक्की केली. वाद विकोपाला जाउ नये म्हणुन समाधान धनुर्धर यांनी व दलित बांधवांनी स्मशानभुमीच्या बाहेर मोकळ्या जागेत राञी १२:३० ला अंत्यसंस्काराचा विधी केला. आईचा धार्मिक विधी पार पाडल्यानंतर समाधान धनुर्धर यांनी आज पाचोरा पोलिसात त्यांच्या नातेवाईकांसह येउन मनोहर पाटिल व त्यांच्या सोबतच्या १० जणांवर भाग ५ गुरन ४२२,भादवी १४३,१४७,२९७,३२३,५०४,५०६ अनुसूचीत जाती आणी जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(S),३(१)(पाच),३(१)(Z),३(२)(VA) प्रमाणे गुन्हा नोंदविला असुन पुढिल तपास उपविभागिय पोलीस अधिकारी भरत काकडे हे करीत आहेत.
पाचोरा तालुक्यातिल निपाणे येथिल दलित समाजाबाबत घडलेली ही घटना अत्यंत विदारक असुन या घटनेतिल जिल्हापरिषद सदस्य मनोहर पाटिल हे याच गटातुन गेल्या २० वर्षांपासुन राजकारण करित आहेत.कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती,पत्नी जिल्हा परिषद सदस्य व स्वतः सुध्दा जिल्हापरिषद सदस्य पद उपभोगलेले व सध्या शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हा प्रमुख म्हणुन कार्यरत असलेले लोकप्रतिनीधीनी असे समाज विघटक कृत्य केल्याने परिसरासह जिल्ह्यातिल दलित समाजात संतप्त भावना असुन पोलिसांनी घटनेचे गार्भिर्य लक्षात घेउन वेळेत पाउले उचलले नाही तर दलित समाजाच्या विविध संघटना लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
अजित पवारांना पिडित कुटुंब व दलित बांधव भेटणार
राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार उद्या पाचोरा येथे नियोजित दौर्यावर येणार असल्याने या प्रकरणी स्थानिक राजकिय दबाव येउ नये व दलित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी भेट घेणार असल्याने विरोधीपक्षनेते अजित पवार काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागुन आहे.




