फडणविसांच्या आक्रस्तळेपणाकडे दुर्लक्ष करा : गोटेंची धुलाई ‘व्हायरल’ !
धुळे । राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एका पत्रकातून सडकून टीका केली असून हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. बघा, गोटे नेमके काय म्हणालेत ते ?
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी एक पत्र सोशल मीडियात व्हायरल केले असून यावरून सोशल मीडियात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. आपल्यासाठी हे पत्र जसेच्या तसे सादर करत आहोत.
फडणवीस सरकारमथील मंत्री हे चिंचोके गोळा खात होते का ?
दिवसागणीक वाढाणारी महागाई, पेट्रोल, डिझेलच्या दैनंदिन भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला सामोरे जाण्याची नैतीकता शिल्लक राहीली नाही. उघडपणे भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांचे समर्थण करुन जनतेच्या रोषाला तोंड देण्याची हिमंत नाही. आपल्या डरपोकपणावर शिक्कामोर्तब होऊ नये. यासाठीच त्यांचे आकांड तांडव चालले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळातच गृहखात्याची वाट लागली. मनाला येईल त्याप्रमाणे बदल्या करायच्या पोलीस यंत्रणेचा वापर करुन विरोधकांनाच नव्हे तर, माजबेज असलेल्या ओबीसी नेत्यांना संपविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पोलीस यंत्रणेला कसे वेठीस धरले होते. अशा असंख्य प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे.
अपंग शिक्षकांच्या नावाने चाललेल्या बोगस संस्थांमधील हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराची देवेंद्र फडणवीसांना Anil Gote मी स्वत: माहीती दिली. त्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीचा फार्स झाला. थोड्या थोडक्या नव्हे तर, ९०० ते ११००शे शिक्षकांना प्रत्येकी किमान
१० लाख रुपये घेऊन. जिल्हा परिषदेच्या सेवेकडे वर्ग केले. एकट्या धुळे जिल्ह्यातच असे शेकडो शिक्षक होते. देवेंद्र फडणवीसांना मी स्वतः कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या आयुक्ताच्या मदतीने पैसे गोळा केले, किती नंबरच्या गाडीतून पैसे कुठे आले, कुणाकडे उतरवले, याची विस्तृत माहीती दिली. सदर मंत्र्यांवर कारवाई करण्याएवजी फडणवीसांनी त्यांना क्लिनचीट दिली.
सदर घटना तत्कालीन महसूल मंत्री आणि ज्यांच्या प्रेरणेने आणि आग्रहाने मी भाजपाची उमेदवारी घेतली. असे, नाथाभाऊ खडसे यांच्या रामटेक’ या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कानी घातली. नंतर मला सुचविण्यात आले. की, गोटेसाहेब ‘हे सर्व पैसे काही मंत्र्यांच्या घरात जात नाहीत. तर, पक्षनिधी जमा केला जातो, तुम्ही कशाला पाण्यात राहून मगरीशी वैर घेता ?’
तरी सुध्दा मी हा विषय फडणवीसांकडे वारंवार उपस्थित करीत होतो. तेही निर्वीकार चेहर्याने व कोडगेपणाने आपण गांभीर्याने या भ्रष्टाचाराची चौकशी करीत आहोत. असे मला भासवत होते. नाशिक, जळगाव महापालीकेच्या निवडणुकांमध्ये डझनानी पक्षप्रवेश करुन घेऊन पाण्यासारखा पैसा उधळुन म्हणजे सत्ता काळात कमवलेले काळे पैसे वापरुन, यश विकत
घेतले. याला काय स्वतंत्र पुराव्याची आवश्यकता आहे का. माझा देवेंद्र फडणवीसांना सरळ सरळ सवाल आहे की, भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाही. ती नैतिकताच तुम्ही केव्हाच गमावीली आहे. उगाच नाक वर करुन आणि लांब जिभ काढून तुम्ही केलेल्या आक्रस्ताळेणावर कुणी काडीचा सुध्दा विश्वास ठेवत नाही. भाजपाच्या आय.टी. सेल मध्ये भरती केलेले तुमचे पाळीव आणि पगारी कर्मचारीच ‘पादलासे सुगंधासु’ असे म्हणत असतील.


