महाराष्ट्र

महाराष्ट्राची लालपरी पुन्हा धावली! 11 हजार एसटी कर्मचारी कामावर परतले

झूम मराठी वृत्त

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता जवळजवळ एक महिना होत आला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या इशाऱ्यानंतरही या आंदोलनावर काही तोडगा निघत नसला तरी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ जाहीर केली आहे. परंतु वेतन वाढीच्या घोषणेनंतर देखील एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्दावर ठाम आहेत. मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनात फूट पडताना दिसत आहे. आज जवळजवळ 11 हजाराहून अधिक कर्मचारी पुन्हा कामावर परतले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

वेतन वाढीची घोषणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर परतण्याचे आवाहन सरकार आणि एसटी महामंडळाने केले होते. त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीनंतर आता कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं चित्र आता बदलताना पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी, 26 नोव्हेंबर रोजी 11 हजार 549 कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. तसेच काही आगारांमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. तर, दुसरीकडे एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्दावर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. आज कामावर रूजू होण्यासाठी शेवटचा दिवस होता. जर आज कामावर कर्मचारी रुजू झाले नाहीत तर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

11 हजाराहून अधिक कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्याने आता राज्यातील अनेक आगारांमधील एसटी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या प्रशासकीय आणि कार्यशाळेतील बऱ्यापैकी कर्मचारी कामावर परतले आहेत. प्रशासकीय विभागात कार्यरत असणाऱ्या 9426 कर्मचाऱ्यांपैकी 6973 कर्मचारी उपस्थित होते. तर, दुसरीकडे कार्यशाळेतील 17 हजार 560 पैकी 3549 कर्मचारी हजर होते. महामंडळातील 37 हजार 225 चालकांपैकी 594 आणि 28 हजार 55 वाहकांपैकी 433 वाहक कामावर परतले आहेत. एसटीतील एकूण 92 हजार 266 कर्मचाऱ्यांपैकी फक्त 11 हजार 549 जणच कामावर रुजू झाले आहेत. तर, अजूनही तब्बल 80 हजार 717 कामावर रुजू झाले नाहीत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे