आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा संपन्न

पाचोरा (झूम मराठी) पाचोरा शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांसाठी पाचोरा तालुका क्रीडा शिक्षकांची सभा दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी 11.00 वाजता एम एम महाविद्यालय पाचोरा येथे गटशिक्षणाधिकारी माननीय नरेंद्र चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष तथा क्रीडा समन्वयक प्रा गिरीष युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली

या प्रसंगी व्यासपीठावर स्पर्धा समितीचे सदस्य गजानन सोमवंशी , बी के पाटील , मुख्याध्यापक सागर सर , पर्यवेक्षक गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या सविचार सभेत तालुक्यातील 10 खेळांचे दि 12/10/22 ते 23/11/22 या कालावधीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा प्रा गिरीष पाटील एम एम कॉलेज पाचोरा, एन आर ठाकरे सर गो से हायस्कुल , एस के पाटील महा देवाचे बांबरुड, सुषांत जाधव शिंदे इंटरनॅशनल पाचोरा , राजपूत सर एस के पवार नगरदेवळा , गजानन सोमवंशी सर पी के शिंदे हायस्कुल पाचोरा या ठिकाणी 14,17,व 19 या वयोगटातील मुले आणि मुली च्या स्पर्धाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला तालुका सर्व जिल्हास्तर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गट शिक्षण अधिकारी नरेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्या पाचोरा तालुक्यातील जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री एन आर ठाकरे , श्री गणेश पाटील व राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री सुनील पाटील , प्रा गिरीष पाटील क्रीडा शिक्षक तसेच मुख्याध्यापक सागर सर यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्या बद्दल यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला यासंदर्भात या सभेत पाचोरा तालुक्यातील विविध खेळातील क्रीडा शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री गणेश पाटील सर यांनी केले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे