आपल खान्देशसखी

बदरखे येथे राजमाता पुण्यश्लोक आहील्यादेवी होळकर जयंती मोठया उत्साहात साजरी

झूम मराठी वृत्तसेवा

पाचोरा तालुक्यातील बदरखे येथे राजमाता पुण्यश्लोक आहील्यादेवी होळकर जयंती उत्सव मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. युगश्री सुरेश परदेशी हिने राजमाता पुण्यश्लोक आहील्यादेवी होळकर यांच पेहराव करून संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली.

पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला, एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता,पराक्रमी योद्धा,आणि सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या, होळकर घराण्याचा ‘तत्वज्ञानी राणी’ म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या अश्या ह्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करताना सर्व प्रथम महाराष्ट्र धनगर समाज महासंघ शाखेचा लोकार्पण कु युगश्री सुरेश परदेशी हस्ते करण्यात आला. सुनीताबाई काशिनाथ परदेशी,.सुशीलाबाई रोहिदास परदेशी, भारती सुरेश हरणे, वर्षाबाई प्रकाश हरणे यांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोकआहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.

बदरखे गावात सर्व महिला व बाल अहिल्याभगिनी यांनी पिवळी साडी व पिवळा फेटा परिधान करुन महादेवाची पिंड हातात घेवुन सहभाग घेतला, सदर मिरवणूक मंत्रमुंग्ध करणारी होती. तसेच समाजातील तरुणवर्ग, ज्येष्ठ नागरिक गावकरी मंडळीनी भव्य दिव्य अशी मिरवणूक मध्ये खूप मोठा सहभाग दाखवला. सदर कार्यक्रमाला माजी पोलीस पाटील काशिनाथ डोंगर हरणे व सद्याचे पोलीस पाटील काशिनाथ दगडु पवार. उपसरपंच प्रशान्त गढरी, सागर फुले, रोशन धनगर,अक्षय हरणे, विजय गढरी सर, मयुर गढरी, स्वानील हरणे.चेतन हरणे, रोहित गढरी, उमेश गढरी  मनोज धनगर, शुभम महादू गढरी, संकेत.गढरी, मनोज धिवरे, निंबा धिवरे, हर्षल सोनवणे व गावातली तरुण मंडळींनी सहभाग दर्शवला तसेच बदरखे ग्रामपंचायत सदस्य सुरेखाबाई कैलास गढरी यांनी कु.युगश्री सुरेश परदेशी यांना राजमाता पुण्यश्लोक आहील्यादेवी होळकर प्रतिमा देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे आभार उपसरपंच प्रशांत गढरी यांनी मानले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे