ब्रेकिंग

होळकरवाड्यात राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे भव्य बक्षीस वितरण समारंभ संपन्न

चांदवड | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन मुंबई आयोजित राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२५ – भव्य बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात चांदवडच्या होळकरवाडा रंगमहाल येथे साजरा करण्यात आला.

काही दिवसात घेण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठया दिमाखात करण्यात आला असून गट ( अ ) प्रथम पारितोषिक राजनंदीनी रूपाली विठ्ठल पडार व कनिष्का करिष्मा जयेंद्र म्हात्रे यांनी पटकवला तसेच गट ( अ ) द्वितीय पारितोषिक प्रणव मयुरी शशीकांत जाधव, विश्वराज कविता अमर पाटील, वेदांत अवंती शिवप्रसाद नाईक, शौर्य जयश्री शिवाजी ठोंबरे यांना देण्यात आला, अ गटात उत्तेजनार्थ अनुश्री चौधरी, हर्षदा मिरगडे, रमा शिंदे, आरोही भोसले, जयवर्धन गवळी, आनंदी इंगळे, ज्ञानेश्वरी फडफड, मैथिली कोकरे,अपुर्वा नांदुरकर, श्रेया वाकसे यांना देण्यात आला.

गट ( ब ) प्रथम प्रतिक्षा उज्वल हेमंत बंदगड व शुभम संगीता बाळासाहेब खरात यांना देण्यात आला, द्वितीय पारितोषिक पायल अर्चना राहुल शेटे, भाग्यश्री लतीका किशोर काळे तसेच या गटातील उत्तेजनार्थ घनश्याम पाटील, अंजली कोळेकर यांना देण्यात आला.

गट ( क )गट ( क ) प्रथम प्रो. स्नेहा सुवास प्रभू महांबरे, अजय भागिरथी दिलीप सकटे तर द्वितीय  नेहा वर्षा सुनिल जाधव, रणरागिणी प्रियांका झेलम शिंपले, तर या गटात उत्तेजनार्थ चंद्रकांत डुंबरे, कुंदा कुलकर्णी, वनिता झुरळे, अरूणा वाघोले यांना देण्यात आला.

या भव्य बक्षीस वितरण सोहळ्यात… श्रीमंत राजे नानासाहेब होळकर, श्रीमंत मुकुंदराजे होळकर, डॉ देवीदास पोटे  कार्यक्रम अध्यक्ष, डॉ. रमिला गायकवाड मुंबई, प्राचार्य अन्वर शेख ( बीड ), डॉ. रमेश पिसे ( नागपूर ), डॉ. प्रेरणा राऊत ( पालघर ), डॉ. तुषार चिंचोले ( नाशिक ), प्राचार्य दत्तात्रय बारगळ, राजीव हाके ( धुळे ), सुभाष पवार ( सहाय्यक मॅनेजर ), प्रा.डॉ. सुरेश पाटील, समाधान बागल, डॉ. वर्षा चौरे, प्रा. सुभाष वाल्हेकर ( त्र्यंबकेश्वर ) आदी मान्यवर उपस्थित होते. आदी विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. जे विजेते अनुपस्थित होते त्यांना पोस्टाने पारितोषिक पाठविले जातील असे संयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाडवी ( बाळा ) यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. वर्षा चौरे यांनी केले. कार्यक्रमास चांदवड शहरातील असंख्य महिला मंडळाच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला. तसेच शांताराम हांडगे सर, समाधान बागल, गुड्डू खैरनार, संजय चौबे, दत्तात्रय राजनोर, नितीन शिंदे, मनोज बांगरे, किरण वाघ, सागर बर्वे, किशोर दीक्षित, महेश खंदारे, गणेश पारवे, राजू झांबरे, सोनू पवार आदी नागरिकांनी उपस्थिती नोंदविली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राजगादीचे पूजनाचे पौरोहित्य अमोल दीक्षित यांनी केले

 

 

 

 

 



 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे