ब्रेकिंग

बदलापूरच्या केमिकल कंपनीत 8 ते 10 भीषण स्फोट..!

बदलापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरवई एमआयडीसीत 8 ते 10 भीषण स्फोट झाले आहेत. खरवई एमआयडीसीतील पॅसिफिक केमिकल कंपनीत हे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बदलापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरवई एमआयडीसीत 8 ते 10 भीषण स्फोट झाले आहेत. खरवई एमआयडीसीतील पॅसिफिक केमिकल कंपनीत हे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीनंतर परिसरात आगीचे लोट पहायला मिळत आहेत. आगीचे हे लोट इतके भीषण आहेत की 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून आग पहायला मिळत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पॅसिफिक केमिकल कंपनीत झालेला हा स्फोट इतका भीषण आहे कीस 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतरात जवळपास आठ ते दहा स्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे परिसरात आग लागली आहे. यानंतर बदलापूर अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्र मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे