आपल खान्देश

ऑनलाइन फसवणुकीपासून सावधान! सायबर गुन्हेगारांच्या जाळ्याला जनजागृतीचा दणका!

ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी जळगावातील ब्राह्मण सभागृहात विशेष ‘सायबर अवेअरनेस इम्पॅक्ट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध फसवणुकीच्या पद्धतींबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले.

डिजिटल व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी? फसवणूक झाल्यास तातडीने काय करावे? आणि सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा? याबाबत नागरिकांना महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. कार्यालय सचिव गणेश भगवान माळी यांच्या सहकार्याने आणि डॉ. आर. बी. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनजागृतीपर उपक्रम यशस्वी झाला.

विशेष म्हणजे, उपस्थित नागरिकांना Quick Heal Foundation च्या Anti Fraud App ची माहिती देण्यात आली आणि त्यांच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून देण्यात आले. लक्षात ठेवा गुन्हेगारांपासून बचाव करण्यासाठी सावधानता हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे! फसवणूक होण्याची वाट पाहू नका…

आजच सायबर सुरक्षेबाबत जागरूक व्हा!

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे