शिवसेना ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा होतांच नांदगाव मध्ये आनंद उत्सव
नांदगाव (मुक्ताराम बागुल) शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची शेतीची घोषणा मुंबई येथे होताच नांदगाव येथे ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. महाराष्ट्रातील राजकारणात आज नवा अध्याय सुरू झाला आहे. राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा झाली असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी यांची युतीची घोषणा झाली.
याप्रसंगी नांदगाव वंचित बहुजन आघाडी शहर व शिवसेना ठाकरे गट यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक नांदगाव येथे एकत्रित येऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आणि मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. व पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, श्रावण आढाव शिवसेना ठाकरे गटाचे नांदगाव शहराध्यक्ष, तर वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव शहर अध्यक्ष अविनाश केदारे, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते अरुण साळवे, जगताप सर विलास कोतकर, चिंधा बागुल, अर्जुन पवार, जितू बागुल, प्रवीण गरुड, दीपक कळमकर, शुभम त्रिभुवन, समाधान लाठे, चेतन शिंदे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


