आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोऱ्यातील शाळेत “आजी आजोबा” दिवस उत्साहात साजरा ..


पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा. येथे आज शाळेतील कलादालन येथे आजी आजोबा दिवस उत्साहात संपन्न करण्यात आला.

सध्याची कौटुंबिक परिस्थिती‎ पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसाया‎ निमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची‎ संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते.‎ शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी‎ आजोबांसोबत घालवतात. आजी आजोबा आणि‎ नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते‎ म्हणून आजी आजोबा पहिले मित्रच‎ असतात. नात्यांची खरी जडण-घडण होत असते‎ म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या‎ घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळाची‎ गरजअसून हे नातं पाल्यांच्या सर्वांगीण‎ विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी ठरणार‎ आहे.शाळेतील अनुभवासह आजी आजोबांचे‎ अनुभव त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती या‎ गोष्टी पाल्यांच्या जडण घडणीसाठी पोषक‎ ठरतात.

त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या‎ माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित‎ करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पा गोष्टी तसेच‎ सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख‎ करण्यासाठी आजी आजोबा दिन साजरा करण्यात आला.

शाळेतील संगीत शिक्षक सागर थोरात यांनी स्वागतगीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले . कार्यक्रमाला आलेल्या आजी आजोबांचे शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांनी आपल्या मनोगत आजी आजोबांचे महत्त्व व सध्या एकत्र कुटुंब पद्धत दुर्मिळ होत चालली असून आजी आजोबांचे विचार प्रेरणादायी ठरतात. हाच उद्देश शासनाने ठेवून हा दिवस साजरा करण्याचे चांगले कार्य केले आहे. वाढत्या वृद्धाश्रमांची संख्या पाहता विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा विचार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक एन आर पाटील, ज्येष्ठ शिक्षिका संगीता वाघ, शितल महाजन, ज्योती ठाकरे, कलाशिक्षक प्रमोद पाटील, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी मनोगतात स्तवन भट या विद्यार्थ्याने आजी आजोबा बद्दल आदर व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी.बोरसे यांनी तर आभार ज्योती ठाकरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे