आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

मुंबई पथकाने धुळ्यात जाऊन लावली आग..!

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका मधील आंबे-रोहिणी परिसरात बुधवारी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या मुंबईच्या पथकाने पुणे आणि नागपूर प्रादेशिक युनिट्सच्या सहकार्याने सांगवी पोलिस ठाणे हद्दीतील ९.४९ एकरावरील बेकायदेशीर गांजाची शेती नष्ट केली. या कारवाईदरम्यान सांगवी पोलिस अनभिज्ञ ठेवण्यात आले होते. नष्ट करण्यात आलेला गांजा कोेट्यवधी रुपयांचा होता.

पथकाने बुधवारी गांजाच्या शेतीवर मोठी कारवाई केली. सात ठिकाणी करण्यात येत असलेली शेती उद्ध्वस्त करण्यासाठी न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोजमाप घेण्यात आले आणि भूअभिलेखांसह जिओ-टॅग केलेल्या छायाचित्रांची नोंद करण्यात आली. एनडीपीएस कायद्याच्या कलम ४८ अंतर्गत संपूर्ण गांजाची शेती जप्त करून नष्ट करण्यात आली. या कारवाईत एकूण ९६ हजार ४९ गांजाची बेकायदेशीर झाडे नष्ट करण्यात आली, तसेच ४२० किलो वाळवलेला गांजा, गोण्यांमध्ये भरलेला आढळला. तो जप्त करून नष्ट करण्यात आला.

स्थानिक पोलिस अनभिज्ञशिरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बाहेरील पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे