देश-विदेशमहाराष्ट्र
पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता धोक्यात, तर लोकप्रिय मुख्यमंत्री यादीत उद्धव ठाकरे चौथ्या स्थानावर!
पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता धोक्यात, तर लोकप्रिय मुख्यमंत्री यादीत उद्धव ठाकरे चौथ्या स्थानावर!फक्त २४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली
देशात गेल्या २ वर्षात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे, दुसरीकडे कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या संकटामुळे आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचं चित्र देशात पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचा जीव गेला. या विविध घटनांमध्ये एका सर्व्हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ६६ टक्क्यावरुन २४ टक्क्यांवर आल्याचं म्हटलं आहे.
फक्त २४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली
इंडिया टूडे मूड ऑफ द नेशन पोलने हे सर्वेक्षण केले आहे. विविध घटनांच्या पार्श्वभुमीवर एका इंग्लिश वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ६६ टक्क्यांवरुन २४ टक्क्यांवर आल्याचं म्हटलं आहे.
देशाचा पुढील पंतप्रधान कोण असावा? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला ६६ टक्के लोकांची पसंती मिळाली होती. मात्र या प्रश्नावर जानेवारी २०२१ मध्ये ३८ टक्के, ऑगस्ट २०२१ मध्ये फक्त २४ टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली होती.
पंतप्रधानांची लोकप्रियता घटली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियेत आता घट होताना दिसत आहे. सर्वेक्षणातून असे दिसून येते की, पंतप्रधानांची लोकप्रियता घटल्याचे म्हणजेच कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे या सर्वेक्षणातून दुसरी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. भाजपाच्या दोन नेत्यांची लोकप्रियता वाढल्याच दिसुन आले आहे.
सर्वेक्षणानुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये पंतप्रधानपदासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाला ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. जानेवारी २०२१ मध्ये ८ टक्के तर ऑगस्टमध्ये ४ टक्के लोकांनी पंसती दिली आहे.





