गुन्हेगारी

डोंबिवली पाठोपाठ कल्याणमध्ये खळबळ! 8 वर्षाच्या मुलीवर शिक्षकाने केला लैगिंक अत्याचार

शरण खन्ना

कल्याण : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर आता त्या पाठोपाठ कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाने अवघ्या आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी  शिक्षक मुदर फकरुद्दीन तालवाला (वय ४२)याला अटक केली आहे.

कल्याण पश्चिमेकडील एका हाय प्रोफाईल सोसायटीत राहणारी आठ वर्षीय विद्यार्थिनी याच परिसरात राहत असलेल्या व खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेकडे शिकवणीसाठी जात होती. मात्र शिकवणी घेणारी शिक्षिका माहेरी गेल्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्षिकेचा पती मुदर तालवला शिकवणीतील विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होता.

काही दिवसांपासून पीडित आठ वर्षीय मुलगी शिकवणीला जायला नकार देऊ लागली. जेव्हा तिची आई शिकवणीला जायला सांगत, तेव्हा ती रडू लागायची. शिकवणीसाठी जात नसल्याने तिच्या आईने शिकवणीला का जात नाही? या बाबत विचारणा केली असता, पीडित मुलगी भीतीच्या छायेखाली असल्याचे तिच्या आईला दिसून आले. तेव्हा आईने मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार हावभाव करुन आईला दाखविला. त्यानंतर आईला तिच्या मुलीसोबत घडलेला प्रकार समजला.

पीडितेच्या आईने त्वरित या किळसवाण्या प्रकाराची सगळी माहिती बाजारपेठ पोलिसांना दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बाजारपेठ पोलिसांनी शिक्षक मुदर तालवाला याला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे