पाचोऱ्यातील सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम चौधरी यांना “जीवनगौरव” पुरस्कार देऊन केला सन्मान..
पत्रकार खान्देश विभागीय अधिवेशनात पुरस्कार देण्यात आला..
पाचोरा येथील गो.से.हायस्कुल मधील सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम सुखदेव चौधरी सर (पत्रकार) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय अधिवेशनात “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पाचोरा येथील प्रसिद्ध गो.से. शाळेचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक, पत्रकार, ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका अध्यक्ष तसेच पाचोरा शहर तेली समाजाचे सचिव असलेल्या शांताराम सुकदेव चौधरी यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सन 2024 चा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे स्थानिक आमदार किशोर पाटील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, जळगाव जिल्हाध्यक्ष नागराज पाटील या मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराची आकर्षक ट्रॉफी शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

