आपल खान्देश

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विनाकारण प्रवास; केला तर दहा हजार दंड!!

जळगाव : ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये अकारण प्रवास करण्याला बंदी घालण्यात आली आहे. यासाठी तब्बल १० हजारांच्या दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने आदेश काढले आहेत.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाने जाहिर केलेल्या नियमावलीनुसार अत्यावश्यक व टाळता न येण्याजोगा प्रवासा व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणांसाठी प्रवास करण्याची मुभा नाही. त्यासाठी परवानगी पास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित केली जात नाही. नियमावलीत दिलेल्‍या कारणांशिवाय व नियमावलीतील नियमांचे पालन न करता केलेला प्रवास दहा हजार रुपयांपर्यंतचा दंडनीय अपराध असून याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात पथके कार्यरत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

ब्रेक द चेन संदर्भातील नियमावलीची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यात २२ एप्रिलच्या रात्री आठ वाजेपासून अंमलात येणार आहे. ती १ मे २०२१ सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहणार आहे. नियमावलीत नमूद केल्याप्रमाणे आंतर जिल्हा अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक व टाळता न येण्याजोगा प्रवास जसे वैद्यकीय उपचार, कुटुंबातील व्यक्तीचे अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी अथवा जीवनावश्यक सेवा पुरवणे यासाठीच मर्यादित आहे. या कारणांसाठी करावयाच्या प्रवाशाला कुठल्याही परवानगी/पासची आवश्यकता नाही असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे