आपल खान्देश

खुशखबर..भुसावळ देवळाली शटल पुन्हा सुरु, दिलीप पाटील यांच्या प्रयत्नाना यश आले..

झूम मराठी वृत्त

पाचोरा : प्रतिनिधी 20 वर्षापासून सुरु असलेली भुसावळ देवळाली शटल ही कोरोना काळात 2 वर्षांपासून बंद करण्यात आली होती, यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते, ग्रामीण प्रवाशांची संपूर्ण गैरसोय होऊन प्रवासी, अपडाऊनर्स, व्यावसायिक, नोकरदार रडकुंडीला आले होते.

रेल्वे सल्लागर दिलीप पाटील यांनी ही ट्रेन सुरू व्हावी अशी सर्व स्तरातून मागणी होती. रेल्वे प्रशासनाकडून सुरु करण्याचे कोणतीही संकेत दिसत नसल्यामुळे उच्चस्तरावर लोकप्रतिनिधींकडे, भुसावळ मंडळाचे रेल्वे सल्लागार सदस्य दिलीप पाटील यांनी वारंवार आपल्या ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटने मार्फत व नुकतीच संपन्न झालेल्या 14 जुलै 2022 रोजीच्या रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करून ही ट्रेन तात्काळ सुरु करावी याबाबत प्रश्न जोरदार उपस्थित केला होता, यावेळी आपल्याकडून या प्रस्तावाचे स्वागत असून ही ट्रेन सुरु करण्याबाबतचा आपल्याकडील प्रस्ताव उच्चस्तरावर पाठवण्यात येतोय व लवकरच ही समस्या मार्गी असे भुसावळ मंडळाकडून लागेल असे सांगण्यात आले होते, ही ट्रेन सुरु होण्याबाबतचे पत्र नुकतेच प्राप्त झाले असून, ही भुसावळ देवळाली पॅसेंजर आता सुरू होत आहे, या ट्रेनचा नवीन ट्रेननंबर 11113 देवळाली भुसावळ तर 11114 भुसावळ देवळाली पॅसेंजर ट्रेन एक्सप्रेस स्वरुपाच्या 12 बोग्यांसह धावेल

या ट्रेनची प्रथम फेरी भुसावळ येथून देवळाली साठी 16 सप्टेंबर 2022 रोजी प्रवासासाठी निघेल तर 17 सप्टेंबर 2022 या तारखेला देवळालीहून भुसावळ कडे परतीचा प्रवास करेल यापासून दररोज ही ट्रेन धावेल, ही ट्रेन देवळालीहून सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी भुसावळकडे निघेल तर 12 वाजून 20 मिनिटांनी भुसावळ येथे पोहचेल, तसेच भुसावळ हून 5 वाजून 30 मिनिटांनी देवळाली कडे निघेल तर 10 वाजून 45 मिनिटांनी देवळाली येथे पोहचेल, ही ट्रेन सुरु होत असल्याने प्रवासी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून यापुढे कोणतीही ट्रेन बंद होऊ देणार नसल्याचे ट्रेन लाइव प्रवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रेल्वे सल्लागार समिती सदस्य दिलीप पाटील यांनी झूम मराठीच्या माध्यमातून सांगितले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे